परवाकडे मी विचार केला की बरेच दिवस झाले आपण ब्लॉग लिहिला नाहीये. म्हणून मग मी नेहमीप्रमाणे माझा जे सॉफ्टवेअर मी ब्लॉग लिहायला वापरतो ते ओपन केलं आणि लिहायला सुरुवात केली. काही वाक्ये लिहुन होत नाहीत तर मला एक मेसेज दिसला की तुम्हाला आता १० मिनिटे थांबावे लागेल कारण हे सॉफ्टवेअर आता मोफत नाहीये. माझा हिरमोड झाला आणि मी लगेच लिहिणे थांबवलं. माझा एक मित्र आहे चैतन्य शिवदे नावाचा. मी लगेच त्याला पिंग केलं आणि विचारलं की बाबा रे आता याला अजून काही पर्याय आहे का? त्याने मला लगेच गुगल IME बद्दल सांगितलं. आणि मला म्हणाला हे जे गुगल चा सॉफ्टवेअर आहे ते आता डाऊनलोड देखील करता येते. आणि हे तुला कदाचित तुझ्या आधीच्या सॉफ्टवेअरपेक्षा जास्त आवडेल.
मीदेखील मग लगेच त्याने दिलेल्या लिंकवर जाऊन ते सॉफ्टवेअर डाऊनलोड केलं. गुगलवर त्याच्या वापराबद्दल थोडी माहिती वाचली. आणि सहज म्हणून लिहायला सुरुवात केली. तर खरोखर चैत्याच्या म्हणण्याप्रमाणे गूगलचे हे सॉफ्टवेअर अतिशय सोपं होतं. मी लगेच मग विचार केला का नाही मग ह्या विषयावर आपण ब्लॉग लिहुयात. आणि मी लिहायला सुरुवात केली. खरोखर हे सॉफ्टवेअर मला अतिशय सोपं आणि सुटसुटीत वाटलं.
आणि मनापासून मी आनंदी झालो. धन्यवाद गुगल. आणि अगदी चैत्या तुझे तर अगदी मनापासून आभार.